माझ्या जीवनावर आधारीत प्रेमकथा लवकरच…; करुणा धनंजय मुंडेंच्या पोस्टमुळेक चर्चेला उधाण

Maharashtra Today

मुंबई :- बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत मोठी घोषणा केली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे बलात्काराच्या आरोपानंतर शांत झालेला वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, अशी माहिती करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन देण्यात आली आहे. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.


 
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button