…तर तो शक्ती कायदा आम्ही काय चाटायचा ? – करुणा धनंजय मुंडे

pooja chavan - karuna munde

मुंबई :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) (करुणा शर्मा) यांनीही उडी घेतली आहे. “जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?”, असा संतापजनक सवाल करुणा शर्मा यांनी फेसबुकवर केला आहे. “आम्ही न्याय मागतो, भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे”, असंदेखील करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.

करुणा शर्मा यांनी जीवन जो सामाजिक संस्थेचे काही बॅनर फेसबुकवर शेअर केले आहेत. या संस्थेचं आपण महाराष्ट्र महिला अध्यक्ष असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर संबंधित बॅनरवर पूजा चव्हाणला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. ‘आम्ही न्याय मागतो, भीक नाही’, असंदेखील बॅनरवर म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : ‘देव करतो ते भल्यासाठीच!  ;  धनंजय मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात सांगितली राजाची गोष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER