करुणा धनंजय मुंडेही राजकारणाच्या आखाड्यात, विधानसभा लढण्याचे संकेत

Karuna Dhananjay Munde is also in the arena of politics

मुंबई :- रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. तसे संकेतही स्वत: करुणा शर्मा यांनी दिले आहे. करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं.

यावेळी त्या म्हणाल्या की, मी समाजसेविका असून राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन त्या महापालिकेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंमधील असलेल्या नात्यावर जाहीरपणे बोलण्यास नकार दिला.

गेली २५ वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या २ महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेल, असं करूणा शर्मा म्हणाल्या.

दरम्यान, अतिरीक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर (Social Media) खलिफा डॉट कॉमसारख्या ॲप्लिकेशन्सवर फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ येत असतात, त्याविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘मिर्झापूर असो की महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’; मनसेकडून शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER