कार्तिक आर्यनची वाढली डिमांड ..दिसेल या अभिनेत्रीसोबत…

kartik

अभिनेता कार्तिक आर्यनची बाॅलीवूड मध्ये चागलीच डिमांड वाढली आहे. त्याचा नुकताच आलेला चित्रपट ‘सोनू के टीटू की स्वीटी’ ने दमदार कमाई करून १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर कार्तिक फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनसाठी करिना कपूरसोबत रॅम्प वॉक करताना दिसला.यात आणखी एक बातमी आहे ती म्हणजे कार्तिक लवकरचं दिनेश विजनच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. तो सुद्धा श्रद्धा कपूर सोबत. होय, कार्तिक आता श्रद्धा कपूर सोबत रोमान्स करतांनी दिसणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत होते. पण आता दिनेश कार्तिक व श्रद्धा या फ्रेश जोडीसोबत नवा चित्रपट घेऊन येत आहे. कार्तिक आर्यन बद्दल सांगायला गेल्यास तर त्याने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो. कार्तिकचा अभिनय सर्व प्रेक्षकांना हसवतो. विशेष म्हणजे तरुणांना खूप आवडतो. त्याचा हाच टॅॅलेंट त्याला आणखी यशस्वी बनवेल हे नक्की…

kartik