कोरोनातून मुक्त झालेल्या कार्तिक आर्यनने घेतली साडे तीन कोटींचीं कार

Kartik Aaryan - Maharastra Today
Kartik Aaryan - Maharastra Today

बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ने अल्पावधीतच चांगले यश आणि लोकप्रियता मिळवली आहे. तसे पाहायला गेले तर त्याचे जास्त सिनेमे रिलीज झालेले नाहीत तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फॅन्सच्या संपर्कात असतो आणि त्याच्या सिनेमांबाबत किंवा खाजगी गोष्टींबाबत फॅन्सपर्यंत माहिती पोहोचवत असतो. काही दिवसांपूर्वीच कार्तिकने त्याला कोरोना झाल्याचे सांगितले होते. तसेच कोरोना काळात त्याने त्याची दिनचर्याही फॅन्सपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवली होती. कार्तिक नुकताच कोरोनामुक्त झाला आणि आता लगेचच त्याने साडे तीन कोटींची लॅम्बोर्गिनी कार ( Lamborghini Urus) विकत घेतल्याची माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याची टेरही खेचली आहे.

कार्तिकला आलिशान गाड्यांचे वेड असून त्याच्याकडे सध्या मिनी कूपर, बीएम डब्ल्यू ५ (BMW 5) सीरीज आणि रॉयल एनफील्ड बाइक आहे. कार्तिकने त्याच्या या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यापैकी एका व्हीडियोत तो गाडीला टेकून उभा असताना पडतानाही दिसत आहे. यावर कार्तिकने लिहिले आहे, अशा आलिशान गाड्या माझ्यासाठी नाहीत असे वाटते. यावर काही यूजर्सनी कार्तिकडे इतके पैसे आले कुठून असा प्रश्न विचारला आहे तर एकाने, तू तर मोठा ड्रायव्हर निघालास थेट लॅम्बोर्गिनी. अन्य एका यूझरने लिहिले आहे, लॅम्बोर्गिनी विकत घेण्यालायक तुझे सिनेमे तरी किती रिलीज झाले? तर एकाने पिवळ्या रंगाची गाडी घ्यायची होती असा सल्ला दिला तर दुसऱ्या एकाने एवढ्या पैशात एक घर खरेदी करता आले असते असे म्हटले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button