बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून कार्तिक आर्यनला ओळखतात

Kartik Aryan

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय नावाने ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यनचा (Karthik Aryan) जन्म २२ नोव्हेंबर १९९० रोजी झाला. कार्तिक यंदा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिकला सर्वप्रथम बॉलिवूडमध्ये ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाद्वारे ओळखले गेले. या चित्रपटात कार्तिकच्या व्यक्तिरेखेला चांगली पसंती मिळाली. या चित्रपटासह कार्तिक आर्यनची फॅन फॉलोइंग झाली आणि त्याला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हटले गेले. कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ …कार्तिक आर्यनचे खरे नाव कार्तिक तिवारी आहे. पण चित्रपटात येण्यासाठी त्याने स्वत:चे नाव कार्तिक आर्यन ठेवले होते.

कार्तिकचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर (Gwalior) येथे झाला. त्याची आई माला तिवारी, वडील मनीष तिवारी आणि लहान बहीण कृतिका- हे त्याचे कुटुंब आहे. कार्तिकने डी. वाय. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नवी मुंबई येथून बायोटेक्नॉलॉजीत पदवी घेतली आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे कार्तिकने अभिनय शाळेत प्रवेश घेतला. यानंतर, त्याने कठोर परिश्रम केले आणि आज इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला काही प्रमाणात स्थापित केले. कार्तिकने हिरो म्हणून पहिल्याच चित्रपटापासून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.

‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला आजही खूपच पसंत केले जाते. या चित्रपटात कार्तिकने एक १५ मिनिटांचा संवाद बोलला आहे. ज्याची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. या संवादामुळे कार्तिकही सर्वाधिक लोकप्रिय झाला होता.२०११ मध्ये पदार्पणानंतर कार्तिकने २०१३ मध्ये ‘आकाशवाणी’ आणि २०१४ मध्ये ‘कांची’ चित्रपटांमध्येही काम केले आहे. तथापि, या दोन्ही चित्रपटांना तितके यश मिळू शकले नाही. परंतु या चित्रपटांचे अपयश कार्तिकचे यश थांबवू शकले नाही. यानंतर ‘प्यार का पंचनामा- २’ मधील कार्तिकच्या जबरदस्त अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली. यानंतर कार्तिक यशाच्या पायर्‍या चढू लागला.

‘लव आज कल’ चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री सारा अली खान होती. या चित्रपटामुळे सारा आणि कार्तिकची चर्चा झाली. दोघ्यांच्याही चाहत्यांना हे खूप आवडले. तथापि, नंतर याला प्रमोशन स्टंटदेखील म्हटले गेले. पण त्यांच्या चाहत्यांनाही त्यांची जोडी नेहमीच आवडली. कार्तिक आर्यनच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘पती, पत्नी और वो’, ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू के स्वीटी’, ‘प्यार का पंचनामा- २’, ‘लव आज कल’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता कार्तिक लवकरच ‘भूल भुलैया- २’ आणि ‘दोस्ताना- २’ मध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER