कार्तिक आर्यनलाही झाली कोरोनाची लागण

Maharashtra Tpday

बॉलिवूडमधील (Bollywood)कलाकारांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच तडाखा दिला आहे. गेल्या काही दिवसात अगदी नीतू कपूर, रणबीर कपूरपासून आशिष विद्यार्थी, मनोज वाजपेयी, संजय लीला भंसाळी यांना कोरोनाची लागण झाली. आणि आता अभिनेता कार्तिक आर्यनलाही कोरोनाची लागण (Karthik Aryan corona positive) झाल्याचे समोर आले आहे. नव्या पिढीतील नायकांमध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या यशस्वी नायकांच्या यादीत गणला जातो. त्याच्याकडे अनेक सिनेमे आहेत. अक्षयकुमारच्या सुपरहिट ‘भूल भुलैया’चा सिक्वेल ‘भूल भुलैया २’ आणि ‘दोस्ताना २’ मध्ये काम करीत आहे. कोरोनाची लागण झाल्याचे कार्तिक आर्यननेच सोशल मीडियावर घोषित केले आहे.

कार्तिक आर्यनने २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ नावाच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्याचा हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यामुळे तो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्याने प्रख्यात फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने तयार केलेला ड्रेस घालून कियारा अडवाणीसोबत रॅम्प वॉक केला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या ‘धमाका’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कार्तिन आर्यन ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्लसचे चिन्ह असलेला फोटो शेअर करून त्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कार्तिकने फोटोसोबत लिहिले आहे, ‘पॉजिटिव्ह झालो आहे. प्रार्थना करा.’ कार्तिकने ही पोस्ट शेअर करताच फॅन्सनी तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. ‘भूल भुलैया २’ चे शूटिंग तो करणार होता पण आता कोरोनामुळे त्याला काही दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने या सिनेमाचे शूटिंग आता काही दिवसांसाठी पुढे ढकलावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER