कर्नाटकने सांगली, कोल्हापूरचा ऑक्सिजन रोखला; महाराष्ट्राची केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी

Oxygen - Maharastra Today

कोल्हापूर :- कर्नाटक सरकारने आज अचानक सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा रोखला. या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारीमधून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता. कर्नाटक सरकारने तो आज बंद केला. सांगली जिल्ह्यातील ऑक्सिजन टँकर आज कर्नाटकमधून रिकामा परतला. सांगली जिल्ह्याला रोजची सध्या ४३ टन ऑक्सिजनची गरज आहे.

केंद्राने हस्तक्षेप करावा – सतेज पाटील
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली. ते म्हणालेत, सध्या तरी यात राजकारण दिसत नाही. मात्र, केंद्राने लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button