कर्नाटक स्थापन करणार मराठा विकास प्राधिकरण! म्हणून परत पाहिजे फडणवीस सरकार – नितेश राणे

Nitesh Rane

मुंबई : कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घेतला आहे. याबाबत आदेश दिला. मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवला आहे.

या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणात उमटत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षामधील नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करून महाविकासआघाडी सरकारवर टीका करताना म्हटले – ”कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० हजार कोटींची तरतूद पण केली. आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले. म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार!”

कर्नाटक राज्यात, मुख्यत्वे सीमारेषेवरील परिसरात असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा विकास प्राधिकरणाच मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे. बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्याच्या आधी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात मराठा समाजातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याच म्हटले जात आहे.

या निर्णयावर महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ”सीमावाद हा कर्नाटकसोबतचा मुद्दा आहे. मराठी भाषिकांना महाराष्ट्राचा भाग व्हायचं आहे. ५० कोटींचा निधी हे याचे निराकरण नाही. दोन्ही सरकारने बसून यावर चर्चा करायला हवी.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER