कर्नाटकात भाजपला सत्तेची संधी? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कुमारस्वामी सरकार संकटात

Kumaraswamy

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकाच्या विधानसभा अध्यक्षांना बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत नियमानुसार आदेश देण्यास सांगितले आहे.

हा निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांवर वेळेची मर्यादा लादता येणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले आहे. कर्नाटक विधिमंडळात कुमारस्वामी सरकारला गुरुवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांनी विश्वासदर्शक ठरावात सामील व्हायलाच पाहिजे असे बंधन नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले असून भाजपला सत्ता स्थापनेची संधी चालून आलेली आहे.