कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्राला आव्हान देण्याची भाषा करू नये : उदय सामंत

Uday Samant

कोल्हापूर : कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी काल ‘बेळगाव (Belgaum) हा कर्नाटकचा (Karnataka) अविभाज्य भाग आहे आणि चंद्र-सूर्य असेपर्यंत तो कर्नाटकातच राहील.’ असे म्हटले होते. केवळ आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी कर्नाटक उपमुख्यमंत्री यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत.

कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज कोल्हापुरात म्हटले.

सामंत म्हणाले, आपल्या देशात घुसखोरी सुरू आहे. त्या सीमा बंद करता आल्या नाही. मात्र, महाराष्ट्रातला माणूस १ नोव्हेंबरला कर्नाटकात जाऊ दिला जात नाही. ही बाब निषेधार्ह आहे. पोलीस प्रशासनाने सीमावर्ती भागात जाऊ नये, असे आवाहन केल्यामुळेच शिनोळी येथील आजचा नियोजित कार्यक्रम रद्द केला. मात्र कर्नाटकातील उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आव्हान शिवसैनिक म्हणून मी स्वीकारत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी वेळ आणि तारीख द्यावी, त्यावेळी आम्ही शिवसैनिकांसह बेळगावात हजर राहू, असे आव्हानही सामंत यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER