कर्नाटक पोटनिवडणूक : भाजपाने १२ जागा जिंकल्या

Karnataka by-election- BJP wins 12 seats

बेंगरुळू :- कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने १२ जागा जिंकल्या. येडियुरप्पा यांच्या सरकारला विधानसभेत बहुमत कायम राखण्यासाठी ६ जागा जिंकणे आवश्यक होते.

जदयू (से) आणि काँग्रेसमधील बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार स्थापन झाले. या घडामोडीत १७ आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यातील १५ जागांवर पोट निवडणूक झाली. भाजपाने १२, काँग्रेसने २ जागा जिंकल्या एका जागी अपक्ष पुढे आहे.

कर्नाटकचा निकाल लागताच पंतप्रधान मोदींचा शिवसेनेला टोला

निकाल आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले की, विधायक पक्षाचा नेता म्हणून मी लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे. विधायक पक्षाच्या नेत्याचा राजीनामा मी सोनिया गांधी यांनाच्याकडे पाठवला आहे.