कर्नाटक पोटनिवडणूक : ११ जागांवर भाजपा पुढे; काँग्रेसनं स्वीकारला पराभव

bjp-congress

बंगळूरू :- कर्नाटकतल्या बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर उच्चन्यायालयाच्या आदेशाने १५ मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. मतमोजणी सुरु आहे, यामध्ये भाजपा १० जागांवर आघाडीवर आहे. भाजपाला सत्ता राखण्यासाठी सहा जागा आवश्यक आहेत. त्यामुळे निकालांच्या कलांनुसार काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे.

निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार म्हणाले की, या १५ मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी दलबदलूंना स्विकारले आहे. आम्ही पराभव स्विकारला आहे. पण, या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही.

‘आम्ही अपघाताने सत्तेपासून बाहेर, मात्र अधिक काळ मागे राहणार नाही’ – फडणवीस

कर्नाटकातल्या सत्ता संघर्षाच्या पक्षांतरात काँग्रेस-जेडीएसच्या १७ बंडखोर आमदारांना बडतर्फ करण्यात आल्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. नंतर येडियुरप्पा सरकार बहुमतात आले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. दरम्यान, उच्च न्यायालयाने २ जागांवरील निवडणूक स्थगित करत १५ जागांवर निवडणुकीला हिरवा कंदील दाखवला होता.