कर्णपूरण : कानात तेल टाकण्याची गरज काय ?

आयुर्वेदात नित्य दिनचर्या पालन नियमात तेल लावण्याला खूप महत्त्व दिले आहे. शरीराची तेलाने मालीश करणे किती महत्त्वाचे आहे हे आपण आधीच्या लेखात वाचलेच असेल. तेलमालीश त्वचेला मुलायम करते व रोगांपासून संरक्षण करण्याचे काम करते. शिर, पाय व कर्ण याला विशेषतः तेल लावण्यास सांगितले आहे.

कानात तेल टाकणे म्हणजेच कर्णपूरण ! आपण कधी तरीच किंवा कान दुखल्यावरच कानात तेल टाकतो; परंतु कर्णपूरण ही नित्य / रोज करण्याची क्रिया आहे. ज्याप्रमाणे दात घासणे, मालीश, व्यायाम, स्नान करणे या निरोगी राहण्याकरिता सांगितलेल्या क्रिया आहेत तसेच कर्णपूरण !

कर्णपूरण का करावे ?

कान हे ज्ञानेंद्रिय आहे. आवाज ऐकण्याचे काम कान करतात. आजकाल ध्वनिप्रदूषण, प्रवास, सतत कानात हेडफोन्सचा वापर यामुळे बाधिर्य, कानात आवाज येणे किंवा कानात मळ साचणे, खडे होणे, कान दुखणे हे त्रास जास्त व लवकर व्हायला लागले आहेत. आजार झाल्यावर डॉक्टरकडे जावेच लागते; पण कर्णपूरणसारख्या क्रिया आजार होऊ नये व अवयवाची शक्ती / कार्य व्यवस्थित चालण्यासाठी सांगितल्या आहेत.

आयुर्वेदात नित्य कर्णपूरणाचे फायदे खालीलप्रमाणे सांगितले आहेत :

  • कर्णरोग होत नाहीत. बाधिर्य होत नाही.
  • मानेचे दुखणे, शिरःशूल, कर्णशूल होत नाही.
  • कानात आवाज येणे, कानात खाज सुटणे इत्यादी व्याधी होत नाहीत.

शास्त्रों में लिखे तेल के फायदे ...

कोणते तेल वापरावे ?
बिल्वादी तेल, लसूण सिद्ध तेल किंवा साधे तीळ तेल.

कर्णपूरण कसे करावे ?
१०० मात्रा होईस्तोवर कानात तेल राहिले पाहिजे. कापसाचा बोळा ठेवावा.

आजकाल मोबाईल, हेडफोन, मोठ्या आवाजामध्ये काम करणे किंवा बराच वेळ गाडी चालविणे, बस-ट्रेन-विमानाचा सतत प्रवास या गोष्टी अनिवार्य तसेच टाळता न येणासारख्या झाल्या आहेत. त्यामुळे कर्णेंद्रियाचे रक्षण व काळजी घेणे आवश्यक आहे. कर्णपूरण अगदी छोटी वेळ न लागणारी परंतु प्रभावी दैनंदिन क्रिया आहे.  त्याचा नक्की अनुभव घ्यावा.

ayurveda

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER