कर्नाळा बॅंक घोटाळाः मावळे यांची बॅंकेच्या प्रशासक पदावर नियुक्ती

Karnal bank

अलिबाग : कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत एक हजार कोटींचा घोटाळा झाल्यानंतर बॅंकेतचे संचालक विवेक पाटील यांचे सर्व अधिकार काढून घण्यात आले होते. त्यानंतर आता श्री जी जी मावळे (डीडीआर रायगड अलिबाग) यांना कर्नाळा सहकारी बँक पनवेल / रायगडचे प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. ते आजच आपला पदभार स्वीकारणार आहेत.

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याआधारे या सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत.

भोसले सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण ७६ जणांवर ठेवीदार-खातेदारांची फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद होती.

रिझर्व बॅंकेने या प्रकरणात अधिकचे लक्ष घातल्यानंतर आता या बॅंकेच्या प्रशासक पदावर श्री जी जी मावळे (डीडीआर रायगड अलिबाग) यांना कर्नाळा सहकारी बँक पनवेल / रायगडचे प्रशासक म्हणून नियुक्त केले.