रोहित पवारांचा विधानसभेसाठीचा ‘हट्ट’ काँग्रेसला अमान्य

Rohit-Pawar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली होती . मात्र याला काँग्रेसतर्फे विरोध करण्यात येत आहे . आघाडीच्या जागावाटपात आजवर कर्जत-जामखेडची जागा कॉंग्रेसकडून लढवण्यात आली आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीतदेखील हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा स्थानिक नेते करत आहेत. जामखेडची जागा यापूर्वी काँग्रेसनेच लढवली होती. त्यामुळे ही जागा सोडणार नाही, असं ठाम मत काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता रोहित यांच्या अडचणी वाढणार असल्याचे ते म्हणाले .दरम्यान रोहित पवारांना हाच मतदासंघ का हवा, यासंदर्भात त्यांनी फेसबूकवर पोस्ट टाकली होती . ‘कर्जत-जामखेड का याचं उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला.

आजवर व्यावसायिक क्षेत्र असो की सामाजिक, राजकीय क्षेत्र ज्याप्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे तसाच विश्वास ते टाकतील; किंबहुना त्यांनीच उमेदवारीची मागणी केल्याने एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकीय कामांचा विचार करून कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधीदेतील, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. ’ असे रोहित पवार म्हणाले होते.