थोर तुझे उपकार आई! : रोहित पवार 

Rohit Pawar-Sunanda Pawar

मुंबई : कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar)देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. रोहित यांनीच ट्विटर आणि फेसबुकवरुन आपल्या आईचे काही फोटो शेअर करत, ‘थोर तुझे उपकार आई!’ असे म्हटले आहे.

रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आणि रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील अनेक उपक्रमातून रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातुन विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत.

सुनंदा पवार सध्या कर्जत आणि जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांच्या एकजुटीने काम करीत आहेत.यावेळी जनतेच्या हितासाठी आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी काम करत असताना त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आमदार रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या मातोश्री देखील पुढे सरसावल्या आहेत. यामुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत.

ही बातमी पण वाचा :  रोहित पवारांनी मोदी सरकारला सुचवली ‘ही’ कल्पना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER