स्टॅम्प ड्युटीत मिळणाऱ्या सूटमुळे करिश्मा ने मुंबईतील घर विकले 10 कोटींना

Karisma_Kapoor

कोरोना काळात सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने बांधकाम व्यवसायही पूर्णपणे ठप्प पडला होता. नवी घरे विकली जात नव्हती त्यामुळे सरकारच्या तिजोरीतही कर रुपाने कसलीही भर पडत नव्हती. बांधकाम उद्योगाला उभारी मिळावी म्हणून राज्य सरकारने स्टॅम्प ड्यूटीत ( stamp duty) सूट देण्याचा निर्णय घेतला. तसेच बिल्डरांच्या फायद्यासाठीही काही सवलती दिल्या. याचा फायदा गरीब, मध्यमवर्गियांना होत नसला तरी कोट्यावधींची संपत्ती असलेल्या कलाकारांनी मात्र याचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. अनेक कलाकारांनी स्टॅम्प ड्यूटीत सूट मिळत असल्याने कोट्यावधींची नवीन घरे घेतली तर आता काही कलाकार त्यांची जुने घरे विकून चांगले पैसे कमवू लागले आहेत. करिश्मा कपूरने (Karisma Kapoor)खार येथील तिचे जुने म्हणजे गेल्या वर्षीच विकत घेतलेले घर नुकतेच थोड्या थोडक्या नव्हे तर चक्क 10.11 कोटी रुपयांना विकले आहे. त्यापूर्वी वांद्रे येथील एक घरही करिश्माने विकले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिश्मा कपूरचा ‘रोज क्वीन’ नावाच्या इमारतीतील 10 व्या मजल्यावर आलिशान फ्लॅट आहे. करिश्मा सध्या तिच्या कुटुंबियांसोबत राहात असून ती समुद्र किनारी नवे घर घेण्याच्या विचारात आहे. यासाठी तिने या इमारतीतील फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा फ्लॅट तिने 10.11 कोटी रुपयांना विकला आणि यासाठी तिला फक्त 20.22 लाखांचीच स्टॅम्प ड्यूटी भरावी लागली आहे.

एकीकडे करिश्माने फ्लॅट विकला असला तरी दुसरीकडे काही कलाकारांनी मात्र जागेत गुंतवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. ऋतिक रोशनने 90 कोटींचा फ्लॅट घेतला असून जान्हवी कपूरनेही 39 कोटींचा फ्लॅट घेतला आहे आणि यासाठी तिने म्हणे बँकेतून 23 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. याशिवाय अनेक छोटे मोटे कलाकार आहेत ज्यांनी जागेत गुंतवणूक केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER