करीना लिहिणार प्रेग्नंसीच्या अनुभवांबाबत पुस्तक

Kareena Kapoor

करीना कपूर (Kareena Kapoor) आता दुसऱ्यांदा आई बनणार आहे. मात्र गरोदर राहिल्याबरोबर करीना आणि सैफने मिडियात याची बातमी दिली. त्यानंतर करीनाने सतत सोशल मीडियावर बेबी बंप दाखवणारे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली होती. या काळातच करीनाने आमिर खानच्या लाल सिंह चड्ढाचे शूटिंग तर पूर्ण केलेच, काही जाहिरातींचेही शूटिंग पूर्ण केले. करीनाने प्रेग्नंसीत काय काळजी घेतली आणि तिने स्वतःला कसे फिट ठेवले याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. करीनाच्या काही मैत्रिणींनीही तिला याचे रहस्य विचारले होते. त्यामुळे करीनाने आता प्रेग्नंसीच्या काळातील अनुभवांवर आधारित एक पुस्तकच लिहून टाकले आहे. या पुस्तकाचे कव्हर रविवारी करीनाने सोशल मीडियावर शेअर केले असून ‘डिलिव्हर्ड सुन’ असा मेसेजही सोबत टाकला आहे.

करीनाने लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव आहे ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’. गर्भधारणेपासून डिलिव्हरीपर्यंतचे सगळे अनुभव करीनाने या पुस्तकात दिले आहेत. तैमूरच्या वेळी गरोदर राहिल्यापासून ते तैमूरचा जन्म, त्याचा सांभाळ, लहान मुलांच्या सवयी, आईने घ्यायची काळजी आणि दुसऱ्या गरोदरपणापर्यंतचा प्रवास करीनाने या पुस्तकात लिहिल्याचे सांगितले जात आहे. पोस्टरसोबत करीनाने लिहिले आहे, “माझ्या पुस्तकाची घोषणा करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उपयुक्त आहे. हे पुस्तक आई बनू पाहाणाऱ्यां सगळ्यांसाठी आहे. या पुस्तकात मी आई बनताना आलेले सर्व अनुभव लिहिणार आहे. आणि हे पुस्तक तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे असे मला वाटते.

करीना लिहित असलेले हे पुस्तक पुढील वर्षी बाजारात येणार आहे. यासोबतच करीनाने तैमूरच्या वाढदिवसानिमित्त एक संदेशही दिला आहे. तैमूरला जीवनात त्याला सगळा आनंद मिळावा आणि त्याने स्वतःची काळजी घ्यावी असे करीनाने या संदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER