करीना कपूर आई बबितासोबत आनंद घेतेय मातृत्वाचा

kareena kapoor

करीना कपूर (Kareena Kapoor) दुसऱ्यांदा आई बनणार असून तिने आपले गरोदरपण लपवून ठेवले नाही. उलट तिनेच माध्यमांना याची माहिती दिली. बेबी बम्पचे फोटोही करीना शेअर करीत असते. गेल्या काही दिवसांपासून करीना आई बबितासोबत मातृत्वाचा (enjoying motherhood ) आनंद घेताना दिसत आहे. गरोदर असली तरी करीनाने चित्रपटांची कामे अजून सोडलेली नाहीत. काही दिवसांपूर्वीच आमिर खानच्या लाल सिंह चड्ढाचे शूटिंग तिने पूर्ण केले.

एवढेच नव्हे तर एका जाहिरातीचेही तिने शूटिंग पूर्ण केले. आणि आता आई बबिताबरोबर वेळ घालवत आहे. आईबरोबरचे वेगवेगळे फोटो करीना सोशल मीडियावर शेअर करीत आहे. काही दिवसांपूर्वी करीना खुर्चीवर बसली असून बबिता तिच्या डोक्याला चंपी करीत असतानाचा फोटो करीनाने शेअर केला होता. आता करीनाने आई बबिताबरोबर बाहेर फिरतानाचे फोटो शेअर केले आहे.

या फोटोत करीनाने अत्यंक सैलसर परंतु शॉर्ट ड्रेस घातला असून कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून तोंडाला मास्क लावल्याचेही दिसत आहे. आई बबितानेही तोंडाला मास्क लावल्याचे फोटोत दिसत आहे. करीना आता लवकरच तख्त चित्रपटाचे शूटिंग करणार असल्याचेही सांगितले जात आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये करीना बाळाला जन्म देणार आहे.

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️💕

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER