बंद झाला करण जोहरचा मल्टीस्टारर फिल्म ‘तख्त’, जाणून घ्या निर्माताने का घेतला हा निर्णय

Takht - Karan Johar

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांनी वर्ष २०१८ मध्ये आपला बहुप्रतिक्षित ‘तख्त’ चित्रपटाची घोषणा केली. हा पीरियड-ड्रामा चित्रपट मोठ्या स्तरावर बनवण्याची चर्चा होती. पण या चित्रपटाविषयी एक वाईट बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार करणने ‘तख्त’ (Takht) हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अनेक कारणे पुढे येत आहेत.

सूत्रानुसार करण जोहरने ‘तख्त’ हा चित्रपट बंद केला आहे. “चित्रपट बंद होण्याची अनेक कारणे आहेत. हा एक महागडा चित्रपट असून २५०-३०० कोटीचे बजेट आहे. कोविड १९ मुळे करण जोहरलाही सर्व निर्मात्यांप्रमाणे तोटा सहन करावा लागला. याखेरीज ब्रह्मास्त्र आणि लायगर हे त्याचे महागडे चित्रपट बनत आहेत.

सुरुवातीला चित्रपटासाठी कोणताही स्टुडिओ तयार नव्हता, असे सूत्रांनी सांगितले. असा विश्वास होता की फॉक्स स्टार स्टुडिओच्या भागीदारीत हा चित्रपट तयार केला जात होता, परंतु तसे कधीच नव्हते. करणने ‘तख्त’ चित्रपटासाठी बर्‍याच स्टुडिओंशी चर्चा केली, पण यश मिळाले नाही.

सूत्रांनी सांगितले की, ‘तख्त’ची कथा मुघल इतिहासावर आधारित आहे आणि सध्याचे राजकीय वातावरण असे आहे की केव्हा या चित्रपटाविषयी वाद सुरू होईल. संजय लीला भन्साली यांच्या पद्मावत या चित्रपटाबद्दल असे वातावरण पाहिले गेले आहे. अशा परिस्थितीत करणला या चित्रपटाविषयी कोणतीही जोखीम घ्यायची नाही. म्हणून त्याने हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, करण काही वर्षांनंतर या चित्रपटावर काम सुरू करू शकेल, असेही या सूत्राने स्पष्ट केले आहे.

सांगण्यात येते की या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: करण जोहर करणार होते. या चित्रपटासाठी रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, अनिल कपूर, जाह्नवी कपूर, विक्की कौशल आणि भूमी पेडणेकर यांना साइन केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER