या मालिकेतून पहिल्यांदा पडद्यावर आला होता करण जोहर

Karan Johar

करण जोहर (Karan Johar) आज एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जात आहे. परंतु लहानपणापासून करणला अभिनयाची आवड होती. त्यामुळेच तो आपल्या चित्रपटात कॅमियो करतो. टीव्ही शो (TV Show) करतो आणि पुरस्कार सोहोळ्याचे अँकरिंगही करतो. एवढेच नव्हे तर बॉम्बे वेल्वेट (Bombay Velvet) चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिकाही साकारली होती.

On Karan Johar's birthday, take a look at his debut work on television -  IBTimes Indiaपरंतु फार कमी जणांना ठाऊक आहे की करण जोहरने अभिनेता म्हणून बाल कलाकाराच्या रुपात सुरुवात केली होती. आणि तीसुद्धा दूरदर्शनवरील मालिकेत. तुमचा विश्वास बसणार नाही परंतु  हो.

अगदी खरे आहे हे. 1989 मध्ये दूरदर्शनवर इंद्रधनुष्य (Indradhanush) नावाची एक मालिका प्रसारित व्हायची आनंद महेंद्रू याचे दिग्दर्शक होते. ही एक फँटेसी मालिका होती आणि यातकरण जोहरने बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. यानंतर मोठ्या पडद्यावर करणने शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनीत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये सहाय्यक कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. इंद्रधनुष्य मालिका पाहाताना मला स्वतःची लाज वाटते असे म्हणत करणने आपल्या पहिल्या भूमिकेला उजाळा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER