करण जोहरने केला होता आमिर खानच्या भावाचा अपमान

Faisal Khan - Aamir Khan - Karan Johar

बॉलिवुडमध्ये (Bollywood) सध्या नेपोटिझमवर प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांचे संपूर्ण कुटुंब बॉलिवुडमध्ये यशस्वी असतानाही त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. करण जोहरने तर एकदा बॉलिवुडधील सुपरस्टार आमिर खानच्या भावाचा अपमान केला होता.

आमिर खानच्या (Aamir Khan) या भावाचे नाव आहे फैजल खान (Faisal Khan). फैजलने आमिरबरोबर मेला चित्रपटात काम केले होेते. स्वतः फैजलनेच एका मुलाखतीत करणने केलेल्या अपमानाची किस्सा सांगितला आहे. एकदा एका पार्टीत मी कोणाशी तरी बोलत होतो तर करण जोहर त्या व्यक्तीला माझ्याशी बोलू नको असे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीला माझ्यापासून दूर नेण्याचाही प्रयत्न करीत होता. करणने माझा अपमान केला. केवळ हीच घटना नव्हे तर असा अनेक घटना माझ्या आय़ुष्यात घडल्या असून अनेकांनी मला अपमानित केले आहे. निर्माते मला त्यांच्या ऑफिसमध्ये येऊ देत नसत.

मेला चित्रपटात आमिरबरोबर काम केल्यानंतर मला वाटले होते माझ्याकडे निर्माते येतील. परंतु एकाही निर्मात्याने मला साईन करण्यात रस दाखवला नाही. यामागचे कारण मला अजूनही कळले नाही. दुसरीकडे आमिरकडे मात्र चित्रपटांच्या प्रचंड ऑफऱ येत होत्या. अनेक दिग्दर्शकांनी तर मला अपॉइंटमेंट देणेही टाळले होते असेही फैजलने या मुलाखतीत सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER