शर्टमुळे ट्रोल झाला करण जोहर

Karan Johar became a troll because of his shirt

बॉलिवूडमध्ये (Bollywood news) काही कलाकार फॅशनच्या नावाखाली कसलेही कपडे घालतात. बॉलिवूडमध्ये त्यांचे नाव असल्याने त्यांनी काहीही केले तरी त्यांची प्रशंसा करणारेही अनेक सहकलाकार असतात. रणवीर सिंह (Ranveer Singh) जसा कसलेही कपडे घालून मिरवत असतो आणि तो स्वतःला स्टाईल स्टेटमेंट असल्याचे भासवतो अगदी त्याचप्रकारे प्रख्यात निर्मात- दिग्दर्शक करण जोहरही (Karan Johar) अनेकदा चित्र-विचित्र कपडे घालून पार्ट्यांमध्ये फिरत असताना दिसतो. दोन दिवसांपूर्वी तो एका पार्टीत असेच काहीतरी विचित्र कपडे घालून आला. मात्र यावेळी त्याच्या शर्टवरून सोशल मीडिया यूझर्सनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

बॉलिवूडमधील प्रख्यात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दोन दिवसांपूर्वी एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी मनीषने ब्लॅक व्हाईट ड्रेस थीम ठेवली होती. मनीष बॉलिवूडमधील अनेकांचा फॅशन डिझायनर असल्याने या पार्टीला करिश्मा कपूर, गौरी खान, अमृता अरोरा, सीमा खान, मलायका अरोरा, नताशा पूनावाला असे पेज थ्रीवरील पाहुणे उपस्थित होते. करण जोहरही या पार्टीला आला होता. यावेळी डोळ्यावर गॉगल असलेल्या करणने वर्तमानपत्राचे प्रिंट असलेला अत्यंत ढगळ असा शर्ट घातलेला होता. या पार्टीचा व्हीडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया यूझर्सना त्याचा हा ड्रेस सेंस जराही आवडला नाही आणि त्यांनी त्याची सोशल मीडियावर यावरून खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

एका मीडिया यूझरने करणच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना लिहिले, ‘अखेर वर्तमानपत्र घातले’. तर दुसऱ्या एका यूझरने लिहिले, ‘चालते-बोलते वर्तमानपत्र आहे’. तर एका यूझरने लिहिले आहे, ‘फनी करण जोहर.’ करणने अजून तरी यूझर्सना कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. पण पुढील काही दिवसात करणवर ट्रोलर्स आणखी तुटून पडणार असल्याची लक्षणे दिसत असून आता करण कोणता पवित्रा घेतो याकडे बॉलिवूडचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER