कराड : पाचवडनजीक पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जखमी बिबट्याचा ठिय्या

cheetah

सातारा : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा ( ता. कराड) परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याने सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ ठिय्या मारला होता. काल, मंगळवारी रात्री सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अर्ध्या तासाने बिबट्याने महामार्गालगतच्या उसात धूम ठोकली.

जखमी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने रात्रभर शोध मोहीम राबवली होती मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. बुधवारी सकाळी या परिसरात वन विभागाने शोध मोहीम सुरु केली होती. काही ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले असून आगाशिव परिसरात बिबट्याने धूम ठोकली याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे पाचवड फाटा परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER