मतदार आता काँग्रेसकडे सक्षम पर्याय म्हणून पाहात नाहीत – कपिल सिब्बल

Kapil Sibbal

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशानंतर आता कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडले. मतदार आता काँग्रेसकडे (Congress)सक्षम पर्याय म्हणून बघत नाहीत, तसंच पक्षाच्या प्रश्नांकडे नेतृत्वाचं लक्षही नाही अशी जहरी टीका सिब्बल यांनी केली. याआधीही पक्षातल्या लेटर बॉम्बमध्ये सिब्बल यांनी पक्षावर टीका केली होती.

पक्षाला समस्यांची जाणीव आहे पण त्या सोडवण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या जात नाही. आमच्या काही जणांनी पक्षासाठी आगामी काळात काय करावं यासाठी पत्र लिहीलं पण आमचं ऐकण्याऐवजी त्यांनी आमच्या सल्ल्याकडे पाठ फिरवली. त्याचा परिणाम आपण सगळेच पाहात आहोत. केवळ बिहारच नाही, तर जिथे जिथे पोटनिवडणुका झाल्या तिथे मतदारांनी पक्षाला सक्षम पर्याय म्हणून स्वीकारलंच नाही अशी खंत सिब्बल यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER