कपिल शर्मा आता नेटफ्लिक्ससाठी वेबसीरीज तयार करणार

प्रख्यात कॉमेडियन कपिल शर्माची (Kapil Sharma) जनमानसातील लोकप्रियात पाहून नेटफ्लिक्सने (Netflix) त्याच्याशी हात मिळवणी केली असून आता तो नेटफ्लिक्ससाठी वेब सीरीज (Web series) तयार करणार आहे. यासाठी कपिल शर्माने एक टीझरही तयार केला असून तो नेटफ्लिक्स आणि कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून रिलीज केला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. टीझरवरून कपिल शर्मा आणखी एक कॉमेडी शो घेऊन येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या शोमधून कपिल शर्मा नेटफ्लिक्स वर एंट्री करणार आहे.

या व्हीडियोमध्ये कपिल शर्मी नेटफ्लिक्ससोबत येणार असल्याचे सांगताना दिसत आहे. तसेच नेटफ्लिक्स पूर्णपणे देशी झाल्याचेही कपिल शर्मा यात बोलताना दिसत आहे. आपल्या या नव्या उपक्रमाची घोषणा कपिल शर्माने त्याच्या नेहमीच्या शैलीत अत्यंत विनोदी पद्धतीनेच केली आहे. व्हीडियोत कपिल शर्मा ऑस्पिशियस शब्द बोलताना अडखळताना दिसतो. त्यामुळे कॅमेरामन त्याला हिंदीत बोलले तरी चालेल असे सांगतो. तेव्हा नेटफ्लिक्सही देशी होत असल्याने हिंदीत बोलतो असे कपिल म्हणतो आणि हिंदीत माहिती देतो. आणि शेवटी इंग्रजी वाक्यही म्हणतो आणि स्वतःच चकित होतो असे दाखवले आहे.

नेटफ्लिक्ससोबत प्रथमच काम करण्याबाबत विचारता कपिलने सांगितले, ‘नेटफ्लिक्ससोबत प्रथमच काम करताना मा खूप आनंद होत आहे. 2020 हे वर्ष खूप चढ-उताराने भरलेले होते. गेल्या वर्षी नागरिकांना दुःख झेलावे लागले, त्यांना त्रासही झाला. त्यांनी झालेला त्रास, दुःख विसरावे आणि नव्या वर्षात आनंदाने, प्रेमाने, सकारात्मकतेने राहावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी नेटफ्लिक्सवर येण्याचा खूप दिवसांपासून विचार करीत होतो. पण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता. हा प्रोजेक्ट माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा असून यातून मी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मी आतूर आहे असेही कपिलने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER