कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी होणार

kapil-dev-hospitalised-after-suffering-heart-attack.jpg

नवी दिल्ली : भारतीय संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे.

कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER