कानपूर टपाल खात्याने चुकून कुख्यात गुंड छोटा राजन, बजरंगीचे चित्र टपाल तिकिटावर छापले

Chota Rajan

कानपूर : कानपूरमधील टपाल खात्याने छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी या कुख्यात गुंडांचे चुकून टपाल तिकीट छापले आणि प्रसिद्ध केले. पोस्टमास्टर जनरल व्ही.के. वर्मा यांनी लिपिकाच्या बाजूने चूक कबूल केली. ते म्हणाले, “हे कसे घडले आणि हा लिपिक गुंडांना का ओळखू शकला नाही, याची आम्ही अंतर्गत चर्चा करीत आहोत. पोस्टल विभागाने सांगितले की, आता त्यांचे कर्मचारी अधिक सावधगिरी बाळगतील आणि अधिक कठोरपणे माहिती तपासून घेतील. माय स्टॅम्प स्कीम अंतर्गत राजन आणि बजरंगी यांचे जवळपास १२ स्टॅम्प छापले आहेत.

ही स्कीम पोस्टल विभागाने २०१७ मध्ये लॉन्च केली होती. या स्कीम अंतर्गत कोणीही ३०० रुपये भरून अशा प्रकारचे आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे फोटोसह स्टॅम्प छापून घेऊ शकतात. हे स्टॅम्प इतर स्टॅम्पसारखे असतात आणि ते लिफाफ्यावरही लावले जाऊ शकतात. ” असे टपाल विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. ही योजना बर्‍यापैकी लोकप्रिय आहे आणि लोक अशा प्रकारचे स्टॅम्प कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना भेट देत आहेत. वर्मा म्हणाले , ही प्रक्रिया आता अधिक व्यापक केली जात आहे, “लिपिक अधिक कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करतील आणि जर ती व्यक्ती वेबकॅमसमोर स्वतः हजर नसेल तर ते त्यांना अशा प्रकारचे स्टॅम्प मिळणार नाही.

” असेही त्यांनी सांगितले. “आतापर्यंत फक्त ओळखपत्र पुरेसे होते; आता आम्ही अधिक माहिती विचारू आणि स्वतः ती व्यक्ती उपस्थित असल्याचे सुनिश्चित करू. ” असे वर्मा म्हणाले. या प्रकरणात कोणी राजन आणि बजरंगी हे त्यांचे नातेवाईक असल्याचा दावा करत छायाचित्रे दिली. त्यांचे ओळखपत्र न मागता, त्या कारकुनाने त्यांच्या छायाचित्रांसह प्रत्येकी १२ मुद्रांक जाहीर केलीत. शिक्के देण्यापूर्वी भरलेल्या फॉर्ममध्ये ‘प्रेम प्रकाश सिंह ऊर्फ मुन्ना बजरंगी’ आणि ‘राजेंद्र निखलजे ऊर्फ छोटा राजन’ अशी नावे होती. राजन सध्या मुंबईच्या तुरुंगात आहे आणि ९ जुलै २०१८ रोजी पश्चिम बंगालच्या बागपत कारागृहात बजरंगीची हत्या करण्यात आली होती. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER