उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा : भाजप नेत्याची मागणी

Thackeray - Kirit Somaiya

मुंबई :- मुंबई मेट्रो-३ कारशेडवरून ठाकरे सरकारला झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कांजूर मार्ग येथे केलं जाणारं  काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपानं ठाकरे सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेची माफी मागावी तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत केली आहे.

ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड जागा अधिग्रहणाचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी. ज्यांच्यामुळे अतिरिक्त खर्च वाढवणार आहे. त्याचबरोबर उशीरही होणार आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही राजीनामा दिला पाहिजे, असे किरीट सोमैय्या म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER