मुंबई पोलिसांचे काम महाराष्ट्र जाणतो; कंगनाच्या वक्तव्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ नये – शरद पवार

Kangana Ranaut-Sharad Pawar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) विरुद्ध कंगना असा वाद सुरू आहे. अभिनेत्री कंगनाने या वादात मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यावरून कंगनावर  सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच कंगनाच्या पीओके (PoK) वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, “मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देत आहोत. असं वक्तव्य केल्यानं जनमानसावर काय परिणाम होईल हे पाहावं लागेल; पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही.

महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कर्तृत्व  त्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वगैरे  केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये. ” शरद पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते. कंगना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील (Bollywood) नेपोटिज्म आणि त्यानंतर इंडस्ट्रीतील ड्रग्सच्या वापरावर धक्कादायक वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केल्याने वाद आणखीनच पेटला. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तिला हरामखोर मुलगी म्हटलं होतं. हा वाद पुढे इतका पेटला की, कंगनाला केंद्रातून वाय सुरक्षा पुरवण्यात आली. केंद्राकडून वाय सुरक्षा मिळवणारी कंगना एकमेव अभिनेत्री ठरली आहे. दरम्यान, कंगना नुकतीच तिच्या मुंबईच्या घरी पोहचली आहे. तर, कंगना मुंबईत पोहचण्यापूर्वीच शिवसेना नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना  बजावले व कंगनाच्या कोणत्याही ट्विट वा विधानावर व्यक्त व्हायचे नाही, असे आदेश दिले होते.

ही बातमी पण वाचा : आता कंगनाकडून मुंबईची तुलना थेट पाकिस्तानशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER