कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, संजय राऊतांची प्रतिक्रिया …

Kangana Ranaut - CM Uddhav Thackeray - Sanjay Raut - BMC

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) बुधवारी मुंबईत (Mumbai) पोहचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव टाकरेंचा (CM Uddhav Thackeray) एकेरी भाषेत उल्लेख केला. तसेच, मुख्यमंत्र्यांवर ट्विटरच्या माध्यमातून वार सुरूच ठेवले. मात्र, कंगना मुंबईत आल्यानंतर कंगनाच्या कोणत्याही विधानांकडे ट्विटकडे लक्ष द्यायचे नाही वा कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे फर्मान मातोश्रीवरून सुटले होते.

दरम्यान, कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विशे, काही न बोलता, ११ कोटी मराठी जनतेने ऐकलं आहे अशी प्रतिक्रिया दिली.

तसेच, कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तिथे एक कायदेशीर विभाग आहे. तुम्ही यासंबंधी महापौरांशी बोलू शकता, ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्यावर मत व्यक्त करणार नाही”. असे राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER