कंगनाच्या कार्यालयाची तोड-फोड; मनपा आयुक्त चहल यांना नोटीस

Kangana Ranaut & iqbal singh chahal

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वांद्रे येथील कार्यालयाचा काही भाग पाडल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना राज्य मानवाधिकार आयोगाने बजावले आहे. उत्तर देण्यासाठी चहल यांना २० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. (State Human Rights Commission summons Commissioner Iqbal Singh Chahal in Kangana Ranaut office case)

कंगना रनौत हिच्या वांद्रे येथील कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महानगरपालिकने कारवाई केली होती. तिच्या बंगल्याचा काही भाग तोडला. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. उच्च न्यायालयानेही ही कारवाई योग्य नसल्याचे सांगत पालिकेच्या कारवाईवर नाराजीही व्यक्त केली होती. अ‌ॅड. आदित्य मिश्रा यांनी या प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत, मानवाधिकाराचे हनन झाल्याचा आरोप केला आहे. मिश्रा यांच्या तक्रारीची दखल घेत मानवाधिकार आयोगाने महापालिका आयुक्तांना समन्स पाठवले आहे.

प्रकरण

कंगनाच्या वांद्रा येथील कार्यालयातील काही भाग अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने ९ सप्टेंबर रोजी कारवाई केली होती. कार्यालयाचा काही भाग महापालिकेने तोडला. या कारवाईविरोधात कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेने कार्यालयाचा ४० टक्के भाग तोडल्याचा दावा कंगनाने केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER