कंगनाच्या आईने मानले मोदी सरकारचे आभार; म्हणाल्या, आम्ही होतो काँग्रेसी …

- आता पूर्णपणे आहोत भाजपाचे

Kangana Ranaut Mother Thanked Modi Government

मंडी : सध्या शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress) पार्टीच्या रागाचे लक्ष्य ठरलेल्या कंगनाला संरक्षण दिल्याबद्दल कंगनाची (Kangana Ranaut) आई आशा यांनी मोदी सरकारने (Modi Government) आभार मानले. त्या म्हणाल्या आमचे कुटुंब अनेक वर्षांपासून काँग्रेसशी (Congress) जुळलेले होते. मात्र, आमच्यावरच्या कठीण परिस्थितीत भाजपा आणि मोदी सरकारने आमची मदत केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांचे आभार व्यक्त करते. आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे आहोत.

आज भाजपाच्या (BJP) जनप्रतिनिधींनी मंडी येथे कंगनाची घरी जाऊन तिच्या आईची भेट घेतळी. त्यांना कंगनाचे संरक्षण करण्याची हमी दिली. भाजपायाच्या नेत्यांसोबत बोलताना त्या म्हणाल्या – आमच्या कुटुंबातील सर्व पूर्वज काँग्रेस पक्षासोबत जुळलेले होते. सर्वाना हे माहित आहे. मात्र आज जेव्हा कंगनावर संकट आले तेव्हा राज्य सरकारने कंगनाच्या संरक्षणासाठी आवश्यक कारवाई केली. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि राज्यातील जयराम ठाकूर हे कंगनाच्या मदतीसाठी उभे राहिले. भाजपाने माझ्या मुलीला संरक्षण दिले.

मुंबईत शिवसेनेची सत्ता असलेल्या मनपाने काल मुंबईतले तिचे ऑफिस तोडले. शिवसेनेने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली, तिला धमक्या दिल्या. शिवसेनेसोबत सत्तेत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही तिच्यावर सतत टीका करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER