
दिल्ली : नवे कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी सध्या शेतकरी आंदोलन करत आहेत. यात बहुसंख्य शेतकरी पंजाबमधील आहेत. या आंदोलनावर व या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ‘सेलिब्रिटी’वर अभिनेत्री कंगना राणावत सतत टीका करते आहे. यामुळे यापुढे पंजाबमध्ये कंगनाचा एकही नवा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून कंगनाने त्यांची तुलना शाहीन बाग आंदोलनातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगना ट्रोल झाली होती. कंगनाने नुकतेच या आजींसंदर्भातील एक ट्विट शेअर केले होते. सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं ट्विट डिलीट केलं आहे. सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला