कंगनाही उतरणार राजकारणात?

Kangana Ranaut

बॉलिवूड (Bollywood) कलाकार आणि राजकारणाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. राजकीय पक्ष कलाकारांना निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी बोलावत असत. कलाकारांच्या लोकप्रियतेमुळे प्रचाराला प्रचंड गर्दी होत असे. अर्थात त्या गर्दीतील किती जण त्या पक्षाला मत देत असतील ही वेगळी गोष्ट, पण उमेदवाराला गर्दी जमवल्याचे समाधान मिळत असे. त्यानंतर तर कलाकारांना थेट निवडणुकीच्या मैदानातच उतरवण्यास सुरुवात झाली. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सुनील दत्त, गोविंदाची नावे आपल्याला ठाऊकच आहेत. त्यानंतर यात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वाढच होत गेली. दक्षिणेतील कलाकारांनी राजकारणात उतरण्याचे लोण हिंदी चित्रपटसृष्टीत आणि आता सगळ्या राज्यात पसरले आहे. प्रख्यात अभिनेत्री खुशबूनेही आता काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. एवढे सगळे रामायण सांगण्याचे कारण कंगना रनौत (Kangana Ranaut) आहे.

आता लवकरच बिहार विधानसभा निवडणुकीचे रणमैदान आरोप-प्रत्यारोपांनी भरणार आहे. या निवडणुकीत कंगना रनौतला प्रचारासाठी उतरवण्याची चर्चा सुरु झाली असून पुढील लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी वड्राच्या विरोधात कंगनाला उमेदवारी देऊन तिला खासदार बनवण्याचे घाटत आहे. यापूर्वीही अनेक कलाकार खासदार म्हणून संसदेत गेले. पण राजकारण न जमल्याने पुन्हा त्यांनी संसदेची वाट धरली नाही.

Shatrughan Sinhaभाजपाचे सक्रिय कार्यकर्ते नेते असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आता काँग्रेसचा हात हतात घेतला आहे. 1984 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 1996 मध्ये ते प्रथमच खासदार म्हणून संसदेत पोहोचले होते. 2002 मध्ये भाजपने पुन्हा त्यांना राज्यसभा खासदार म्हणून संसदेत पाठवले होते. 2003 आणि 2004 च्या दरम्यान ते अटलबिहारी सरकारमध्ये आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री म्हणून काम केले आहे.

Rajesh Khannaयापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार राजेश खन्नाला काँग्रेसने भाजपचे फायरब्रॅन्ड नेते लालकृष्ण आडवाणीच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. 1991 च्या निवडणुकीत राजेश खन्ना आणि लालकृष्ण आडवाणी यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढवली होती. यात राजेश खन्नाचा फक्त 1500 मतांनी पराभव झाला होता.

Amitabh Bachchanकाँग्रेसनेच अमिताभ बच्चनलाही लोकदलाकडून उभे असलेल्या हेमवती नंदन बहुगुणा यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत अमिताभने बहुगुणा यांना जवळ जवळ दोन लाख मतांनी हरवले होते. या पराभवानंतर हेमवतीनंदन बहुगुणा यांची राजकीय कारकिर्दच संपुष्टात आली होती. बोफोर्स घोटाळ्यानंतर अमिताभने राजीनामा दिला आणि नंतर तो पुन्हा राजकारणाच्या फंदात पडला नाही.

Jaya Pradaजया प्रदाला सपाचे अमर सिंह यांनी राजकारणात आणले आणि रामपुरमधून काँग्रेसच्या बेगम नूर बानो यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले. जया प्रदाने बेगम नूर बानोचा पराभव केला आणि संसदेत खासदार म्हणून पोहोचली. मात्र 2014 मध्ये जया प्रदा निवडणुक हरली. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करीत जया प्रदाने पुन्हा निवडणूक लढवली मात्र आजम खान यांनी जवळ जवळ एक लाख दहा हजार मतांनी जयाप्रदाचा पराभव केला.Hema Malini

जयाप्रदाप्रमाणेच हेमा मालिनीही राजकारणात उतरली असून 2014 मध्ये मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. लोकदलाच्या जयंत चौधरी यांचा हेमा मालिनीने पराभव केला होता. तर 2019 मध्येही हेमा मालिनीने काँग्रेस आणि लोकदलाच्या बाहुबली उमेदवारांचा पराभव केला आणि पुन्हा एकदा संसदेत खासदार म्हणून प्रवेश मिळवला आहे.

Smriti Irani accuses Deepika Padukone of standing with those seeking India's destruction at JNUछोट्या पडद्यावर छोटी बहू म्हणून लोकप्रिय झालेल्या स्मृति ईरानी यांनी यंदा चक्क अमेठीत राहुल गांधी यांचाच पराभव करून आपण पक्के राजकारणी आहोत हे दाखवून दिले आहे. सध्या मंत्रीपदी असलेल्या स्मृति इरानी यांनी अॅक्टिंग सोडून 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांना महाराष्ट्र यूथ विंगच्या उपाध्यक्षा बनवण्यात आले. 2014 ला भाजपने त्यांना अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणुकीत उतरवले. स्मृती इरानीचा पराभव झाला पण मंत्रीपद मिळाले. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांनी राहुल गांधींचा पराभव केला.Sunil Dutt

त्यापूर्वी सुनील दत्त यांनीही 1984 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करीत प्रख्यात वकील राम जेठमलानी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभ केला. सुनील दत्त पाच वेळा खासदार झाले. त्यानंतर त्यांची मुलगी प्रिया खासदार झाली. पम 2019 मध्ये प्रिया दत्त यांना पराभवाची चव चाखावी लागली,

Govindaगोविंदाने 2004 मध्ये काँग्रेसकडून निवडणुक लढवताना भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. पुढील निवडणुकीच्या वेळी मात्र मात्र त्याने राजकारणाला रामराम केला. उर्मिला मातोंडकरही यावेळी निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसकडून उतरली होती पण पहिल्याच वेळी तिला पराभवाचा सामना करावा लागला. सनी देओल, रवि किशन, मनोज तिवारी, असे कलाकारही सध्या राजकारणात व्यस्त आहेत. त्यात आता कंगनाची भर पडणार असल्याचे दिसत आहे.

Urmila Matondkar

Sunny Deol

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER