
कंगना रनौत (Kangana Ranaut) समाजात आणि बॉलिवुडमध्ये (Bollywood) घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत असते. आदित्य पंचोली, ऋतिक रोशनसोबतचे तिचे वाद जगजाहीर आहेत. त्यातच आता प्रख्यात लेखक जावेद अख्तर यांनीही कंगनावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही दिलजीत दोसांज आणि कंगनामध्ये चांगलेच ट्विटवॉर सुरु आहे. एकीकडे असे वाद घडवून आणत असतानाच तिने तिच्या सिनेमाचे शूटिंगही सुरु ठेवले आहे. कंगना अत्यंत धार्मिक आहे हे तिच्या वागण्या-बोलण्यातून आणि तिच्या पोस्टमधूनही ती दाखवून देते.
कंगनाने नुकतीच एक पोस्ट शेयर केली असून त्यात तिने देवीचे मंदिर बांधायचे असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये कंगना तिच्या खानदानी मंदिराचा फोटोही शेअर केला आहे, कंगना म्हणते. दुर्गा मातेने मला भव्य मंदिर बनवण्यासाठी निवडले आहे. माझ्या पूर्वजांनी जे मंदिर बांधले होते ते त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार बांधले आहे. परंतु देवी इतकी दयाळु आहे की, तिने आमच्या या घराचाही स्वीकार केला. परंतु एक दिवस मी देवीचे असे मंदिर बांधणार आहे जे देवीची कीर्ती आणि आपल्या महान सभ्यतेचे दर्शन घडवणारे असे. जय माता दी.
कंगना सध्या अनेक सिनेमात काम करीत असून ती पुढील महिन्यात मुंबईत न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्यासाठी येणार आहे. मात्र त्यापूर्वी ती थलाईवी सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला