कंगनाने घेतले पुरी जगन्नाथाचे दर्शन

kangana

कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर कंगना जवळ जवळ रोजच सोशल मीडियावर व्यक्त होत असते. मग ते बॉलिवूडमधील नेपोटिझम असो वा शेतकरी आंदोलन असो. कंगना आपली मते व्यक्त करीत असते. सध्या ती मध्य प्रदेशमध्ये तिच्या नव्या ‘धाकड’ (Dhakad) सिनेमाचे शूटिंग करीत आहे. कंगना वेळोवेळी देवदर्शनही करीत असते. मुंबईला आली तेव्हा ती प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनालाही गेली होती. आता मध्य प्रदेशमध्ये शूटिंग करीत असताना कंगनाने वेळ काढला आणि ओरिसाला जाऊन पुरी जगन्नाथाचे (Puri Jagannath) दर्शन घेतले.

काही दिवसांपूर्वी कंगनाने धाकड सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून तिची तुलना हॉलिवूड स्टार टॉम क्रूझशी केली होती. त्यामुळे कंगना खूपच ट्रोल झाली होती. मात्र त्यानंतर तिने यावर स्पष्टीकरण देताना लिहिले होते, ‘मी असा दावा कधीही केला नव्हता. निक पॉवेल जगातील सगळ्यात मोठा स्टंट डायरेक्टर आहे. एक आलिंगन आणि काही बरनॉल पाठवत आहे असे म्हणत तिने ट्रोलर्सना उत्तर दिले होते.

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुरी जगन्नाथाच्या दर्शनाबाबत फोटोसह माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी कंगना जगन्नाथ मंदिरात गेली आणि पुरी जगन्नाथाचे दर्शन घेतले. यावेळी तिच्या टीमचे सदस्यही तिच्यासोबत होते. कंगनाने ट्विटर वर मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. फोटोंसोबत कंगनाने लिहिले आहे, ‘आपण नेहमी भगवान श्रीकृष्ण यांना राधा किंवा रुक्मिणीसोबतच पाहिलेले आहे. परंतु पुरी जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा या भावा बहिणीसोबत दिसतो. मला मंदिरात खूपच सुखद अनुभव आला. यासोबतच कंगनाने ‘श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव‘ असेही पोस्टमध्ये लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER