कंगनाची ट्विटरनंतर इन्स्टाग्रामवरूनही होणार हकालपट्टी? डिलीट केली एक पोस्ट

Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त विधानाने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते . काही वादग्रस्त ट्विटमुळे याआधीच कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले गेले आहे. यानंतर अभिनेत्री इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय झाली आहे. अशात आता इन्स्टाग्रामनंदेखील तिची पोस्ट डिलीट केली आहे. यानंतर भडकलेल्या अभिनेत्रीनं आपण इथे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे म्हटले आहे.

कंगनाने म्हटले की , ‘इन्स्टाग्रामने माझी एक पोस्ट डिलीट केली़ ज्यात मी कोविड संपवण्याची धमकी दिली होती. माझ्या या पोस्टमुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्यात. अतिरेकी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानुभूती असलेले दुखावले, हे तर मी ट्विटरवर पाहिले आहे. पण कोविडचा फॅन क्लब आहे, हे हैराण करणारे आहे. इन्स्टावर दोनच दिवस झालेत. पण इथेही मी आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकेल, असे वाटत नाहीये. ’ असे कंगनाने इन्स्टास्टोरीवर लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button