कंगना, वाघ, गाढव आणि सिंह….

Shailendra Paranjapeकोण्त्याही गोष्टीचा सुखान्त झाला की अँण्ड दे लिव्ह्ड हँपिली एव्हरआफ्टर, असं म्हटलं जातं. म्हणजे आणि ते सुखाने नांदू लागले, असा शेवट. असाच काहीसा शेवट कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shiv Sena) भांडणाचा झालाय. पण या भांडणानंतर होणार सलेल्या परिणतीमधे आणि नेहमीच्या सुखान्तिकेमधे क महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे एकदा काचेला तडा गेला की तो कायमचा राहतो, हे मात्र होणार आहे.

अभिनेत सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर दीर्घकाळ लोटल्यानंतर कंगनाच्याच मुलाखतीनंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते, हे विसरून चालणार नाही. कंगनानं यापूवीर्ही बॉलिवूडमधल्या (Bollywood) अपप्रवृत्तींबद्दल आवाज उठवलेला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांविरुद्ध (Mumbai Police) तिनं मत व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच्या अन्य राजापेक्षा राजनिष्ठ लोकांनीही त्यात उड्या घेतल्या. मग काय धुरळाच धुरळा आणि पब्लिकची फुकटची सोशल मिडिया करमणूक. नाही तरी करोना काळात वेगळा विरंगुळा लोकांनाही हवाच होता. रोज रोज करोनाचे वाढते रुग्ण, प्रशासन हताश वगैरे वाचून ऐकून लोक बोअर झाले होते.

अशा वेळी सगळ्यात जालीम उपाय हा बॉलिवूडच्या मसाला ड्रामाचाच हवा होता. तो झाला आहे आणि या बॉलिवूड मसाला करमणुकीनंतर शिवसेनेनं कंगनाचा विषय आता आमच्यासाठी संपलाय, असं जाहीर केल्याचं शिवसेनेच्या एका प्रवक्त्यांनी जाहीर केलंय.

अर्थात, कंगनाचा विषय संपवण्याचा अपघात अचानक घडलेला नाही तर त्यामागे लोकशाही आघाडी सरकारचे जन्मदाते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचाही वाटा मोठा आहे. न्यायालयानं ज्या कारणासाठी महापालिकेच्या पथकाला परत पाठवले त्याच धर्तीवर पवार यांची प्रतिक्रिया होती. मुंबईत अनेक अवैध बांधकामं आहेत आणि अवैध बांधकामं मुंबईला नवीन नाहीत, हे त्यांचं म्हणणं म्हणजे शिवसेनेसाठी आणि मुंबई महापालिकेसाठी सोनारानं टोचले कान, असाच प्रकार होता. त्यामुळेच तर कंगनाचा विषय आता संपलाय, हा अपघात घडलाय.

मुळात कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई, तिला पालिकेने २०१८मधेच नोटीस दिली होती हा दावा आणि त्यावर कंगनानं केलेला खुलासा, हे सारं महापालिकेची कारवाई आकसानं केलेली आहे, हे सिद्ध करायला पुरेसं आहे. त्यामुळेच तर सिनियर पवार साहेबांनी सरकारचे कान टोचलेत.

या साºया प्रकारात सरकारचे विशेषत: शिवसेनेचे हसे झाले आहे. आपल्या आततायी कार्यशैलीमुळं शिवसेनेने यापूर्वीही हात दाखवून अवलक्षण करून घेतलेले आहे. तसेच उत्साही प्रवक्त्यांमुळे एखादा पक्ष अडचणीत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. लोकसभेच्या २००४च्या निवडणुकांमधे देशभर फील गुड आणि शायनिंग इंडियाचे वातावरण होते. पण कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयीचे अपउल्लेख भाजपाला निवडणुकीत अपयश येण्यासाठी एक महत्त्वाचे कारण ठरले होते, हे विसरता कामा नये.

त्याच पद्धतीने आपल्या देशात, समाजात कंगना असो की अन्य कोमीही महिला, तिच्याविरुद्ध अख्खी यंत्रणा किंवा शिवसेनेसारखी मिलिटंट संघटना आवाज उटवते, धमक्यांची भाषा वापरते, तेव्हा अंतिम निकाल ठरलेलाच असतो. कंगना बोलून चालून बॉलिवूड अभिनेत्री, तिला गमावण्यासारखे काहीही नव्हते. त्यामुळे तिचा फायदाच झालेला आहे पण हसं शिवसेनेचं झालंय.

जाता जाता एक बोधकथा- जंगलात परस्परात भांडून वाघ आणि गाढव जंगलचे राजे सिंह यांच्याकडे जातात. वाघ सिंहाला सांगतो की गाढवानं कसा गाढवपणा केलाय ते. त्यावर सिंह वाघाला एक लाफा लावतो….वाघाला लाफा लावायचं कारण सिंह सांगतो. ते असं…तुझा मुद्दा कितीही बरोबर असला तरीही मुळात गाढवाच्या नादी लागलास म्हणून तुला लाफा लावलाय.

महत्त्वाची सूचना – यात  स्थानिक राजकारणातले संदर्भ शोधू नयेत. फक्त बोध घ्यावा.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER