कंगनाला तोंड फोडण्याची धमकी; प्रताप सरनाईकांवर कारवाई करा – महिला आयोग

Kangana Ranaut & Women Commison

दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली. शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक यांनी – शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिचे तोंड फोडतील, असे धमकीवजा वक्तव्य केले.

सरनाईक यांनी दिलेल्या धमकीची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी प्रताप सरनाईक यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की – खासदार संजय राऊत (Samjay Raut) यांनी कंगनाला सौम्य शब्दात सांगितले.

पण ती जर इथे आली तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिला चोख प्रत्युत्तर देतील. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या की, प्रताप सरनाईक यांनी कंगनाला धमकी दिली आहे. त्यांना तत्काळ अटक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER