परभणीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कंगनाच्या पुतळ्याचे दहन

Kangana Ranaut1

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकिस्तान (Pakistan) व्याप्त भागाशी केली. तिच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (Shiv Sena) अधिकच आक्रमक झाली आहे. कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत परभणीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कंगणा राणावतच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

परभणीतील खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कंगणा राणावतच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तिच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER