कंगनाने सुरु केले ‘तेजस’चे काम

Kangana Ranaut - Tejas

सुशांत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणानंतर राज्यातील शिवसेनेशी (Shiv Sena) थेट पंगा घेणारी कंगना रनौत (Kangana Ranaut) चित्रपटांमध्ये सध्या चांगलीच व्यस्त आहे. राजकीय शेरेबाजी करता-करताच ती आपल्या कामावरही बऱ्यापैकी लक्ष ठेऊन आहे. नुकतेच तिने चेन्नईत जाऊन तामिळनाडूच्या स्वर्गीय मुख्यमंत्री जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारित ‘थलाइवी’ चित्रपटाचे शूटिंग केले. सध्या ती भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. यातच तिने आता आपल्या नव्या ‘तेजस’ (Tejas) चित्रपटाच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या तयारीचा एक व्हीडियो कंगनाने सोशल मीडियावर टाकला असून त्यासोबत तेजससाठी वर्कशॉप सुरु केल्याचेही म्हटले आहे.

या व्हीडियोमध्ये ती दिग्दर्शक सर्वेश मेवाडा आणि तिचे ट्रेनर विंग कमांडर अभिजीत गोखले यांच्यासोबत दिसत आहे, या चित्रपटात कंगना एका फायटर विमानाच्या पायलटची भूमिका साकारीत आहे. 2016 मध्ये इंडियन एअर फोर्सने महिलांनाही फायटर विमानांच्या पायलटच्या रुपात काम करण्यास संधी दिली होती. अशी संधी देणारे एअरफोर्स हे पहिले संरक्षण दल होते. हा चित्रपट याच ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. ‘थलाइवी’ आणि ‘तेजस’सोबतच कंगना ‘धाकड़’ चित्रपटातही दिसणार आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडियोत कंगना म्हणते. आज टीम ‘तेजस’ ने वर्कशॉप सुरु केले. टॅलेंटेड डायरेक्टर सर्वेश मेवाडा आणि आमचे कोच विंग कमांडर अभिजीत गोखले यांच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला.

कंगनाचा हा एक वेगळा चित्रपट असून तो पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER