भावाच्या लग्नासाठी कंगनाने खर्च केले तब्बल सहा कोटी रुपये

Kangana Ranaut

अगोदर ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि नंतर बॉलिवूडमधील (Bollywood) नेपोटिझम, ड्रग्जवरून बॉलिवूडवर टीकेची झोड उठवल्यानंतर अभिनेत्री कंगनाने महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका करून खळबळ माजवली होती. त्यामुळेच तिच्या खार येथील घरावर मनपाने कारवाई करून तेथील बांधकाम तोडले होते. यावरून शिवसेनेची प्रचंड बदनामी झाली होती. कंगनावर तक्रार दाखल झाली असून तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु भावाचे लग्न असल्याने आपण नंतर येऊ असे कंगनाने (Kangana Ranaut) सांगितले आहे. कंगनाच्या भावाचे राजस्थानमध्ये अतिशय भव्य प्रमाणात नुकतेच लग्न झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाने भावाच्या लग्नावर थोडे थोडके नव्हे तर तब्बल सहा कोटी रुपये खर्च केले आहेत.

गुरुवारी उदयपुरच्या द लीला पॅलेस या आलिशान हॉटेलमध्ये कंगनाचा भाऊ अक्षतचे रितु सागवानशी अत्यंत थाटामाटात झाले. भावाच्या लग्नात कंगनाने गुजराती बांधणीचा लेहंगा घातला होता. या लेहंग्याची किंमतच 18 लाख रुपये होती आणि तो बनवण्यासाठी जवळ जवळ 14 महिने लागले होते. कंगनासाठी हा लेहंगा फॅशन डिझायनर अनुराधा वकीलने तयार केला होता. याशिवाय कंगनाने 45 लाख रुपयांचे दागिनेही घातले होते. हे दागिने प्रख्यात डिझायनर सब्यसाची ने तयार केले होते. संपूर्ण लीला पॅलेस हॉटेलला रजवाडी थीमने सजवण्यात आले होते. मात्र कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या या लग्नात कोरोना नियमामुळे फक्त 45 नातेवाईक मित्रच सहभागी झाले होते. पाहुण्यांसाठी राजस्थानी जेवण होते आणि लग्नात राजस्थानी कलाकारांनी आपली कलाही सादर केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER