कंगनाने बिनशर्त माफी मागावी ; भाजप प्रवक्त्याची मागणी

Kangana Ranaut.jpg

नवी दिल्ली :- वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत (Kangana Ranaut) हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावतने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि अडचणीत सापडली. या आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या एका वयोवृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने केले आणि काही वेळात तिने हे ट्वीट डिलीट केले.

मात्र तोपर्यंत या ट्वीटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते. यावरून कंगना जबरदस्त ट्रोल झाली. कंगनावर आता पंजाबी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान आता कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरूद्वाराच्या एका सदस्याने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

दरम्यान भाजप प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी ट्वीट करून अभिनेत्रींकडून जाहीरपणे माफी मागण्याची मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा : “आत्मचिंतनाची गरज भाजपलाच” परिवहनमंत्री श्री. अनिल परब यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER