कंगनाने शिशुपालच्या अपराधांची आणि त्याच्या शिरच्छेदाची आठवण करून दिली ट्रोलर्सना

Kangana Ranaut.jpg

कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड अॅक्टिव्ह असून रोज ती वेगवेगळ्या विषयावर मते व्यक्त करताना अनेकांवर तोंडसुख घेत असते. यामुळे अनेक कलाकार आणि समाजातील अन्य व्यक्तींसोबत तिचे चांगलेच वादही झाले आहेत. कंगनाच्या विविध वक्तव्यांवरून तिला ट्रोलही करण्यात आले आहे. पण कंगना कशाचीही पर्वा न करता सोशल मीडियावर मते व्यक्त करीत असते. कंगनाच्या या वागण्यामुळेच काही दिवसांपूर्वी तिचे ट्विटर अकांउंट काही काळाकरिता प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र आता कंगनाने याबाबत ट्विटरच्या सीईओला टॅग करून चांगलेच सुनावले आहे.

कंगनाचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी बंद करण्यात आले होते अशी माहिती स्वतः कंगनानेच ट्विटरवरून दिली असून यात तिने ट्विटरचा सीईओ जॅक यालाही टॅग केले आहे. एवढेच नव्हे तर जॅकला कडक शब्दात सुनावलेही आहे. केवळ जॅकच नव्हे तर कंगनाचे अकाउंट बंद करण्याची मागणी करणाऱ्यांवरही तिने चांगलेच तोंडसुुख घेतले आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी ‘तांडव’ वेबसीरीजवरून दिग्दर्शक अली अब्बास जफरला (Ali Abbas Zafar) खूप झापले होते. कंगनाने तांडवबाबत लिहिले होते.’भगवान श्रीकृष्णांनीही शिशुपालला 99 गुन्हे होईपर्यंत माफ केले होते. प्रथम शांती नंतर क्रांती. त्यांचे धड वेगळे करण्याची वेळ आली आहे. जय श्रीकृष्ण. कंगनाच्या या ट्विटनंतर कंगनावर ट्रोलर्स तुटून पडले होते. त्यानंतर ट्विटरवर #SuspendKanganaRanaut ट्रेंड होऊ लागला होता.

कंगनाने यानंतर दुसरे ट्विट करीत तिचे अकाउंट बंद करण्याची मागणी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘लिबरल आता त्यांचे काका जॅककडे जाऊन रडू लागले आणि माझे अकाउंट बंद करण्याची मागणी केली. माझे अकाउंट काही काळासाठी प्रतिबंधितही करण्यात आले. ते लोक मला आता धमकी देऊ लागले आहेत. माझे अकाउंट किंवा माझी व्हर्च्युअल आयडेंटिटी देशासाठी कधीही शहीद होऊ शकते. पण माझी देशभक्तीची मुख्य भूमिका सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येतच राहील. मी तुमचे जीवन कठिण करून सोडेन. असा इशाराही कंगनाने तिच्या विरोधकांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER