कंगना रणौतला कोरोनाची लागण ; स्वत: दिली माहिती

Maharashtra Today

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत(kangana-ranut) देखील कोरोना पॉझिटिव्ह(Corona Positive) आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने याबाबत स्वत: माहिती दिली आहे.

कंगनाने करोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. स्वत:चा फोटो शेअर करत तिने ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल करोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन आणि इतर काही कलाकरांना करोना झाला होता. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री कंगना रणौतला देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button