कंगना रनौतच्या बहिणीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, नेटक-यांनी केले ट्रोल

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात कोरोनाशी युद्धस्तरावर लढत आहेत म्हणून देशभरातून त्यांची स्तुती होत असताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची बहिण रंगोली चंडेल हीने ट्विटरवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर टाका केली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे, असं रंगोलीने ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि तिला सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी, कोरोनाचे हे युद्ध जिंकण्याकरिता केंद्र सरकारपासून सर्व राज्य सरकारे कसोशीने प्रयत्न करत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता हॉटेलमध्ये 10,000 खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी हॉस्पिटलमध्ये देखील 10,000 खोल्या करोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार ठेवल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अनेक उपाययोजना राबवत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाकरेंनी राज्यात अनेक मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये शेतीच्या साधनसामग्रीचा समावेश केला.

प्रत्येक राज्याचं सरकार आपल्या आपल्या पातळीवर, परिस्थती ओळखून शक्य तेवढ्या खबरदारी घेत आहेत असे असतानाही रंगोली चंडेल यांनी केलेल्या टिकेला महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील लोकांनी तिला रिट्विट करत ट्रोल केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री टाकरेंवर टीका करणे रंगोली चंडेल यांना चागलेच महागात पडत आहे असे दिसते.