कंगना आता ट्विटरऐवजी कू अँप वापरणार

ट्विटरने (Twitter) काही दिवसांपूर्वी कंगनाचे (Kangana Ranaut) ट्विटर अकाउंट सस्पेंड केले होते. कंगनाने शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट केल्याने ट्विटरने हे पाऊल उचलले होेते. त्यानंतर कंगनाने ट्विटरवर चांगलेच तोंडसुख घेतले घेतले होते. ट्विटरच्या सीईओंनाही तिने टॅग करून सुनावले होते. ट्विटरला पर्याय म्हणून कू हे भारतीय अँप समोर आले आहे. कंगनाने लगेचच कू अँपवर स्वतःचे अकाऊंट ओपन करून त्याची जाहिरात तिच्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे. एवढेच नव्हे तर कंगनाला कू अँपवर फॉलो करा असेही सुचवले आहे.

कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्विटर सोडण्याचे सूतोवाच करीत होती. पण ट्विटरप्रमाणे एखादे सोशल मीडिया अँप तिला मिळत नव्हते. ते कू अँपमुळे मिळाले आहे. ट्विरवर तिच्या या कू अँपची माहिती देतानाच तिने ‘कू अँप’ची लिंक शेअर करीत ‘हे माझे कू अकाउंट असून येथे मला फॉलो करा असे म्हटले आहे. पुढे कंगनाने म्हटले आहे, मा माझ्या सगळ्या मित्रांना कू अँपवर पाहू इच्छिते. जेव्हा तुम्ही कू अँप ज्वाईन कराल तेव्हा मला डायरेक्ट मेसेज करा. कंगनाने तिच्या ‘कू अँप’ वरील तिच्या माहितीमध्ये स्वतःला देशभक्त आणि ‘गरम रक्ताची क्षत्रिय महिला’ असे म्हटले आहे. ‘कू अॅप’च्या पहिल्याच पोस्टमध्ये कंगनाने लिहिले आहे, ‘सगळ्यांना हॅलो. कात्री काम करीत आहे आणि हा ‘धाकड’ क्रू चा लंच ब्रेक आहे.

त्यामुळे कू करावे असे मला वाटले. या नव्या अँपवर रुळण्यास मला थोडा वेळ लागेल, परंतु भाड्याचे घर बाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते, भले ते कसेही असेना का? असे म्हणत कंगनाने कू हे स्वदेसी अँप असल्याचे तिच्या फॅन्सना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाने कू अँपच्या प्रोफाइलवर धाकड’ सिनेमाच्या शूटिंगचा फोटो ठेवलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER