शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही, कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल – रामदास आठवले

Ramdas Athawale-Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त विधानाने ती गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबईकर (Mumbai news), बॉलिवूड (Bollywood), शिवसेना (Shivsena), कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) अशा सर्वच स्तरातून कंगनावर जोरदार टीका होत आहे. मात्र, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कंगना रणौतच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

ही बातमी पण वाचा:- ‘कंगना तो एक बहाना है’,’बेबी पेंग्विन को बचाना है’ : नितेश राणे 

लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल,असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने म्हटलं होतं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं म्हटलं होतं. यावर मुंबईची तुलना कंगनाने पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळले.

मुंबईला पाकव्याप्त काश्मिर संबोधणा-या कंगनावर मराठी कलाकार, बॉलिवूड, राजकीय नेते विशेषतः शिवसेना चिथावली आहे. कंगना विरोधात आज शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे.

दरम्यान, आपण 9 सप्टेंबरला मुंबईत येतोय कुणाच्या बापात हिम्मत असेल तर रोखून दाखवा असे आव्हानदेखील कंगनाने दिले आहे.

दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कंगनाच्या समर्थनार्थ भूमिका घेत कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER